वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

देखोनि हरखली अंड । प

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072720 · अभंग क्र. १६९

169.
देखोनि हरखली अंड । पुत्र झाला म्हणे रांड ।
तंव तो झाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोका । जोडी भांडवल थुंका ।
थोर झाला चुका । वर का नाही घातली ॥२॥
भूमि कांपे त्याच्या भारे । कुंभपाकाची शरीरे ।
बोले निष्ठुर उत्तरे । पापदृष्टि मळिण चित्त ॥३॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगते विटाळ ।
तुका म्हणे खळ । म्हणॊनिया निषिद्ध तो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग