सदा नामघोष करू हरीकथ
3254.
सदा नामघोष करू हरीकथा । तेणे सदा चित्ता समाधान ॥१॥
सर्वसुख ल्यालो सर्व अळंकार । आनंदे निर्भर डुल्लतसो ॥धृपद॥
असो ऐसा कोठे आठवचि नाही । देहीच विदेही भोगू दशा ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप । लागो नेदू पापपुण्य अंगा ॥३॥
अर्थ :
आम्ही नेहमी हरीनामाचा घोष करु व हरीकथा करु त्याने आमच्या चित्ताला समाधान मिळते. आम्ही सर्व प्रकारचे सुख व परमार्थिक सर्व प्रकारचे अलंकार देहावर धारण केले आहेत व त्या आनंदानेच आम्ही डोलत आहोत. आम्ही कोठेही असो आम्हाला त्याचे भानच राहात नाही कोठे आहोत हे देखील आम्हाला आठवणीत राहात नाही. आम्ही या मनुष्य देहात तर आहोत तरी देखील हरीनामाचे चिंतन करुन आम्ही विजयी दशा भोगू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता अग्नीरुप झालो आहोत जसे अग्नीला कोणीही विटाळू शकत नाही त्याप्रमाणे आम्ही झालो आहोत त्यामुळे आता आम्ही आमच्या अंगाला पाप आणि पुण्य हे लागूच देणार नाहीत.
