वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

विक्षेपता नाना उठती

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074459 · अभंग क्र. ४९८

498.
विक्षेपता नाना उठती कल्पना ।
पासूनिया जाणा शूद्ध जावे ॥१॥
तरीच ते ज्ञान हृदयी ठसावे ।
नातरी आघवे व्यर्थ होय ॥२॥
अमृताचे कुंभ सायासे जोडले ।
त्यामाजी घातले विष जैसे ॥३॥
मन हे विटाळ अखंड चंचळ ।
न राहे चपळ एके ठायी ॥४॥
ज्ञानदेव म्हणे गुरूकृपा होता ।
लाहिजे तत्त्वता ब्रह्मसुख ॥५॥

अर्थ :
चित्तांत अनेक प्रकारचे विक्षेप कल्पना उत्पन्न होत असतात ते सर्व टाकून देऊन चित्त शुद्ध करून घेतले पाहिजे. तरच जीवब्रह्मैक्यज्ञान अंतःकरणांत ठसावेल, नाही तर सर्व फुकट आहे. जसे कष्ट करून मिळविलेल्या अमृताने भरलेल्या घागरीत विषमिश्रण केले असता ते अमृत निरुपयोगी होते. एके ठिकाणी न राहणारे अत्यंत चपळ, चंचल असलेले अशुद्ध मन त्याचा शुद्ध परमात्म पाशा सबंध होणे विटाळ आहे. ते ब्रह्मसुख गुरूकृपा झाली म्हणजे सहज प्राप्त होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग