वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

पुरविली आळी । जे जे

🙏 3. संत तुकाराम · ABH-079730 · अभंग क्र. ३९७२

3972.
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळी ॥१॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥धृपद॥
घेतले नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥
तुका म्हणे घास । मुखी घाली ब्रम्हरस ॥३॥

अर्थ :
पाडूरंगा आम्ही ज्या ज्यावेळी जो जो हट्ट केला त्या त्यावेळी तू तो हट्ट पूर्ण केलास. अहो या पाडूरंगा सारखी आई कुठे आहे काय हे कोणी तरी सांगा. एकदा की, त्याने भक्ताला कडेवर उचलून घेतले की मग त्या भक्ताला पुन्हा ती खाली उतरवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पाडूरंग भक्तांच्या मुखामध्ये आणि माझ्या मुखामध्ये ब्रम्हरसाचा घास घालतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग