मरण सांगा स्वामी कवण
1398.
मरण सांगा स्वामी कवणिया गुणे | संसारी मरण उरले नाही ॥१॥
आम्हा मरण नाही मेले होते काई | श्रीगुरुच्या पायी राहे मना ॥२॥
मरणे हे काया मरणे हे माया मरे हे छाया कवण्या गुणे ॥३॥
भक्ति अमरकंदु रामनाम वंदू | नामयासी छंदू विठोबाचा ॥४॥
