बरवे झाले लागलो कारण
4045.
बरवे झाले लागलो कारणी । तुमचे राहिलो चरणी । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणी वैखरी ॥१॥
न वंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसी । झालो संताची अंदणी दासी । केला येविशी निर्धार ॥धृपद॥
जीवनी राखिला जिव्हाळा । झालो मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥
जयाचे जया होईल ठावे । लाहो या साधियेला भावे । ऐसे होते राखियले जीवे । येथूनि देवे भोवंडुनी ॥३॥
आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपे । दुसरे कापे सत्ताधाके ॥४॥
अंकिले पणे आनंदरूप । आतळो नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपे आप एकाएकी ॥५॥
अर्थ :
बरे झाले देवा तुमची सेवा करण्याच्या निमित्ताने तुमच्या पायाजवळ मी राहिलो आहे. आता संतसंगतीमध्ये राहून तुमचे गुणगान माझ्या वाणीने वर्णन करण्याची आणि हरीनामाचा जयघोष करण्याची माझी इच्छा तृप्ती होईपर्यंत करुन घेईन. मी माझ्या शरीराला तुमच्या सेवेवाचून वंचित राहू देणार नाही. कायावाचा मनाने मी तुमची सेवा करीन. दासीला ज्याप्रमाणे आंदन दयावे त्याप्रमाणे मी संतांची आंदन दासी झालो आहे आणि त्याविषयी मी पूर्णपणे निर्धार केला आहे. देवा तुम्ही जगाचे जीवन आहात त्याच जीवनाशी मी माझा जिव्हाळा राखला आहे. आणि मी माझ्यापासून म्हणजे या देहापासून व देहसंबंधीपासून निराळा होऊन राहिलो आहे. आता पंचमहाभूतांचा हा पुतळा म्हणजे देह या जगामध्ये सहजच वावरत आहे. ज्या देवाने हा देह दिला आहे त्या देवालाच या देहाची काळजी आहे त्यामुळे मी तर केवळ आता भक्तिभाव करण्याचे ठरविलेले आहे. अशा स्थितीतून बाहेर काढून
