अठरा दिगांतीहुनी पाळ
873.
अठरा दिगांतीहुनी पाळणा आणिला ।
तेथे एक निर्गुण बाळ पहुडला ॥१॥
बाळा हे नाही बाळा हे नाही ।
अंगुष्ठ पिउनी घेई निरालंबी ॥२॥
निरालंबी सादू आळवी ब्रह्मी ।
तेथे एकु बाळ बोभाये निरंजनी ॥३॥
बापरखुमादेविवरू आदि अंती ।
त्याहुनी परती मज गति केली ॥४॥
अर्थ :
अठरा दिगंती म्हणजे, अठरा पुराणाचा शोध करून एक पाळणा आणला. आणि त्यात निर्गुण बाळ परमात्मा निजले. बाळाजवळ कोणी एक नाही. 'अंगुष्टमात्र' म्हणजे स्वरूपानंद घेऊन निरालंब स्थितित निजले आहे. ज्या निरालंब स्थितीत बाळक निजले आहे त्याचे चिंतन करून त्याला आळव. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या स्वरूपांशिवाय आरंभी किंवा अंती मला दुसरी गती नाही. असे माऊली सांगतात.
