शरीर दुःखाचे कोठार ।
4066.
शरीर दुःखाचे कोठार । शरीर रोगाचे भांडार । शरीर दुर्गंधीची थार । नाही अपवित्र शरीरा ऐसे ॥१॥
शरीर उत्तम चांगले । शरीर सुखाचे घोंसुले । शरीरे साध्य होय केले । शरीरे साधले परब्रम्ह ॥धृपद॥
शरीर विटाळाचे अळे । मायामोहपाशजाळे । पतन शरीराच्या मुळे । शरीर काळे व्यापिले ॥२॥
शरीर सकळ हे शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरे तुटे भवबंध । वसे मध्यभागी देव शरीरा ॥३॥
शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा राधा । शरीरी वसे बहुत बाधा । नाही गुण सुदा एक शरीरी ॥४॥
शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावे सुख न करी त्याग । शरीर वोखटे ना चांग । तुका म्हणे वेग करी हरीभजनी ॥५॥
अर्थ :
शरीर दु:खाचे कोठार आहे शरीर रोगाचे भांडार आहे. शरीर हे दुर्गंध साठवण्याची जागाच आहे शरीरा सारखे अपवित्र असे दुसरे काहीही नाही. याच मनुष्य शरीरामध्ये जर परमार्थ केला तर शरीर अतिशय उत्तम व चांगले आहे शरीर सुखाचे घडच आहे. शरीराने जर साध्य केले तर सर्व काही प्राप्त होते तसेच याच शरीराने परब्रम्ह देखील आपल्याला साधला जाऊ शकतो. शरीर हे स्त्रीच्या विटाळाच्या अळयापासून बनलेले असून माया व मोहपाशाचे जाळेच आहे. शरीराच्यामुळे आपण अधोगतीला जाऊ शकतो आणि शरीर हे काळेने व्यापलेले आहे शरीर हे सर्वात शुध्द आहे व परमार्थाचा ठेवाही आहे. शरीराच्या मध्यभागी देवाची वस्ती असून शरीराच्या मदतीने भवबंधाचा पाश तुटला जातो. शरीर अविद्येचा बांधा असून शरीर अवगुणाचा कालाच आहे. शरीरामध्ये अनेक प्रकारच्या बाधा आहेत त्यामध्ये एक सुध्दा चांगले गुण नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, शरीराला विविध प्रकारचे भो
