विश्वामित्रे तत्क्षण
298.
विश्वामित्रे तत्क्षणी । सिद्ध आश्रमा येउनी ॥1॥
बैसे येउनी आश्रमासी । करी मातंग यागासी ॥2॥
सहस्त्र अवदान आहुती । होता प्रगटली शक्ति ॥3॥
विश्वामित्रे तयेवेळे । देवी वरदानाचे बळे ॥4॥
व्याघ्र हिंडती राने राने । बंद केले येणे जाणे ॥5॥
कृषा न जाती कृषिक । तीर्थयात्रेसी पांथिक ॥6॥
धेनु न जाती वनासी । वाट नाही वेव्हारासी ॥7॥
प्रजा जाऊन राजसभे । हात जोडोनिया उभे ॥8॥
ऐसी प्रजेची हे वाणी । राजा विचारितो मनी ॥9॥
गुरुवचन धरिता चित्ती । माझी होईल अपकीर्ति ॥10॥
राव निघाला स्वारीसी । म्हणे नामयाची दासी ॥11॥
