सर्वाघटीं बिंबला व्य
523.
सर्वाघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुंडलिके उभा केला विटेवरी ॥१॥
सांवळा चतुर्भुज कांसे पीतांबर । वैजयंती माळ शोभे कंठी ॥२॥
कटावरी कर पाउले साजिरी । उभा तो श्रीहरीं विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी बिंबे तो बिंबला । बिंब बिंबोनी ठेला देहामाजीं ॥४॥
