गगनाहूनि व्यापक वायु
523.
गगनाहूनि व्यापक वायुहूनि चालक ।
अग्नीहूनी दाहक आन नसे ॥१॥
ब्रह्म परिपूर्ण तोचि सनातन ।
स्वये आनंदघन आन नसे ॥२॥
दृश्याहूनि गोचर इहिहूनि पर ।
गुरूवीण ज्ञानेश्वर आन नसे ॥३॥
अर्थ :
परमात्मा आकाशापेक्षाही व्यापक आहे. तसेच वायु सर्वांचा चालक आहे. पण त्या वायुचाही चालक परमात्मा आहे. अग्नीची दाहकशक्ती मोठी खरी पण ती अलस्वरूपाहून वेगळी नाही. तरी ते ब्रह्मच पूर्ण, सर्वव्यापी, अनादि व आनंदघन असून सर्व दृश्य वस्तुच्याही पलीकडे आहे. मीही ज्ञानस्वरूप जे ब्रह्मरूप सदगुरु त्यांच्याहून वेगळा नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
