वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

आत्मरूपी नाही पाठी आ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074455 · अभंग क्र. ४९१

491.
आत्मरूपी नाही पाठी आणि पोट ।
एकचि निघोट जाण रया ॥१॥
बाहीर भीतरी एकचि ते एक ।
नसे आन देख भेद रया ॥२॥
ठेंगणे नावाड हळू ना ते जड ।
स्वयेंची अखंड पूर्ण रया ॥३॥
जाणणे नेणणे दोन्ही तेथे नाही ।
आहे जैसे पाही तेचि रया ॥४॥
सदोदीत शुद्ध म्हणे ज्ञानेश्वर ।
नाहीच विकार कीर रया ॥५॥

अर्थ :
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाठ पोट वगैरे कोणताच भेद नाही. ते निरवयव असल्यामुळे निर्विकार आहे. ते आत्मतत्त्व देहाच्या आत किंवा बाहेर आहे असे नाही, ते सर्वव्यापी भेदरहित आहे. ते ठेंगणे, उंच, हलके, भारी नसून अखंड परिपूर्ण आहे त्याच्याठिकाणी ज्ञान, अज्ञान ही दोन्ही नसून ते नित्यशुद्ध ज्ञानरूप जसेच्या तसेच आहे. त्या वस्तुच्या ठिकाणी विकार नसुन ती सदोदित नित्य शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग