वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकरी परत आल्या नं

🙏 3. संत तुकाराम · ABH-079698 · अभंग क्र. ३५९६

3596.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
घालूनिया ज्योती । वाट पाहे दिवसराती ॥१॥
बहु उताविळ मन । तुमचे व्हावे दरुषण ॥धृपद॥
आलो बोळवीत । तैसे याचि पंथे चित्त ॥२॥
तुका म्हणे पेणी । येता जाता दिवस गणी ॥३॥

अर्थ :
हे माझ्या वारकऱ्यांनो ज्या दिवसापासून तुम्ही पंढरीला पायी गेलात त्या दिवसापासून मी माझ्या डोळयात तेल घालून तुमची रात्रंदिवस सारखी वाट पाहात आहे. तुमचे दर्शन व्हावे यासाठी मन फार उतावीळ झाले होते. पंढरीस जाणाऱ्या पंथाकडे जेव्हापासून मी तुम्हाला मार्गस्थ केले त्याच मार्गाकडे माझे चित्त सारखे लागलेले होते. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझ्या वारकऱ्यांनो ज्या दिवसापासून तुम्ही पंढरीला निघले होते त्या दिवसापासून तुम्ही येथे जेवत असाल, येथे तुमचा मुक्काम असेल, येथून तुम्ही आता मार्गस्थ झाले असाल असे मी सारखे दिवस मोजीत होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग