देवा तू कृपाकरुणासिं
4032.
देवा तू कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥
शरणागता वज्रपंजर । अभयदाना तू उदार । सकळा देवा तू अगोचर । होसी अविकार अविनाश ॥धृपद॥
भागली स्तुति करिता फार । तेथे मी काय ते गव्हार । जाणावया तुझा विचार । नको अंतर देऊ आता ॥२॥
नेणे भाव परि म्हणवींतो तुझा । नेणे भक्ती परि करितो पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धावणे ॥३॥
तुझिया बळे पंढरीनाथा । झालो निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथा । न भी सर्वथा तुका म्हणे ॥४॥
अर्थ :
देवा तू कृपेचा व करुणेचा सिंधू म्हणजे समुद्र आहेस आणि तूच आमचा मायबाप आणि बंधू म्हणजे भाऊ आहेस. देवा जेणेकरुन जीवन सिध्द होईल अशा साधनांचा तू समुद्र आहेस तू भवबंध तोडणारा व काळ पाश तोडणारा आहेस. तुला शरण आलेल्या भक्तांचा तू वज्रपंजर आहेस, भक्तांना अभयदान देणारा तू उदार दाता आहेस. तू सर्व देवांना न दिसणारा म्हणजे अगोचर आहेस त्यांना तू अविषय आहेस आणि तू अविकार असून अविनाशी आहेस. देवा तुझी स्तुती करताना शेषासारखे वेदासारखे थकून गेले तर माझ्यासारख्या गव्हार अज्ञानी मनुष्याचे तेथे काय आहे ? देवा मला तुझे स्वरुप कळावे यासाठी मला तू तुझ्यापासून दूर करु नकोस. देवा भाव म्हणजे काय मला हे माहित नाही परंतू स्वत:ला मी तुझा म्हणून घेतो आणि भक्ति म्हणजे काय हे मला माहित नाही परंतू तुझी पूजा मी करतो. हे केशीराजा आम्ही तुमचे नाम घेतो त्यामुळे तुला आमच्या मदतीसाठी धावून यावेच लागते. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा आम्ही तुझ्या बळानेच निर्भर म्हणजे निष्काळजी झाल
