अहोरात्र वाचे वदा ।
875.
अहोरात्र वाचे वदा । राम गोविंद नामची ॥१॥
तेणे तुटे भेदाभेद । निरसे संसाराच्या कंद ॥२॥
ध्यानीं मनी आणि शयनी । वाचे वदा चक्रपाणी ॥३॥
ध्येय ध्याता ध्यान । आठवावे मधुसुदन ॥४॥
एका जनार्दनी घोका । आवडीने रामसखा ॥५॥