अनंत लावण्याची शोभा
24.
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥1॥
पितांबर माल गाठी । भाविकासी घाली मिठी ॥2॥
त्याचे पाय चुरी हाते । कष्टलीस माझे माते ॥3॥
आवडी बोले त्यासी । चला जाऊ एकांतासी ॥4॥
ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळा ॥5॥