वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

कवतुकवाणे । बोलो बोब

🙏 3. संत तुकाराम · ABH-080240 · अभंग क्र. १८३६

1836.
कवतुकवाणे । बोलो बोबड्या वचने ॥१॥
हे तो नसावे अंतरी । आम्हा धरायाचे दुरी ॥धृपद॥
स्तुति तैसी निंदा । माना समचि गोविंदा ॥२॥
तुका म्हणे बोले । मज तुह्मी शिकविले ॥३॥

अर्थ :
देवा, मी तुमच्याशी कौतुकाने व बोबड्या शब्दाने बोलत आहे. तरी माझ्यावर रागावून मला पायापासून दूर करण्याचे तुमच्या मनात येऊ देऊ नये ; हीच माझी विनंती आहे. गोविंदा, माझ्या बोलण्यात स्तुती अथवा निंदा जरी घडली, तरी ती तुम्ही सारखीच माना. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तरी आपल्या पदरचे कोठे बोलतो ! तुम्ही जसे शिकविले तसे मी बोलत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग