संसारसागरी पडलो महाप
1497.
संसारसागरी पडलो महापरी ॥ सोडवण करी देवराया ॥१॥
नामाची सांगडी देऊनिया माते ॥ वैकुंठावस्ते नेळनि घाडी ॥२॥
काम क्रोध मगर करिती माझा ग्रास ॥ झणी तू उदास होशील देवा ॥३॥
नामा ह्मणे झणी मोकालिसी माते ॥ नाम तुझे सरते धरले एक ॥४॥
