वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

देव नाही तेथे पूजी त

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074454 · अभंग क्र. ५४८

548.
देव नाही तेथे पूजी तया कोण भक्त ।
गुरुशी ठाव नाही कोणी शिष्याशी पुसत ॥१॥
सदोदीत ब्रह्म पूर्ण निराकार निर्गुण ।
भेदाभेद क्षीण तेथे अनुभवी हे खूण ॥२॥
आदि अंत मध्य नाही दृश्य दृष्टा दर्शन ।
सच्चिदानंदरूप वस्तु सनातन ॥३॥
एक तेचि अनेक झाले अनेकरुपी एक ।
खुण सांगे ज्ञानेश्वर जग जाणा कल्पक ॥४॥

अर्थ :
देवच जेथे नाही मग त्याची पूजा करणारा भक्त कोण असणार? गुरुचा जर पत्ता नाही तर शिष्यांना विचारतो कोण? ब्रह्म सर्वव्यापक, निर्गुण, निराकार व सनातन असल्यामुळे त्यात भेदाभेद मुळीच नाहीत. हे अनुभवाच्या खुणेने कळेल. ब्रह्माला आदि, मध्य व अंत हे तिन्ही नाही तसेच ते कोणाला पाहात नाही. व कोणाच्या पाहण्याचा विषयही होत नाही. अगर दर्शनही म्हणजे कोणाचे ज्ञानही नाही. म्हणजे त्रिपुटीविवर्जित आहे. ते अनादि सच्चिदानंदरुपच आहे. ते ब्रह्मतत्त्व एकच असून अनेकरूपाने प्रतीतीला येते. म्हणून जगत् काल्पनिक आहे. अशी तुम्हाला खूण सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग