स्पर्श कराल मजसी तरी
3640.
स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकतांचि वचन मागे फ़िरे ॥१॥
जनमुखें सर्व कळाला समाचार । परि अंतरी साचार व्यग्र नोहे ॥२॥
ह्रदयी ध्यातसे रखुमाईचा पती । निवारिली भ्रांती संसाराची ॥३॥
एका जनार्दनी चालविला नेम । परि पुरुषोत्तम नवलपरी ॥४॥
