वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

धरिता इच्छा दुरी पळे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078142 · अभंग क्र. २१२५

2125.
धरिता इच्छा दुरी पळे । पाठी सोहंळा उदासा ॥१॥
म्हणऊनि असट मन । नका खुण सांगतो ॥धृपद॥
आविसापासी अवघे वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥
तुका म्हणे बीज न्यावे । तेथे यावे फळाने ॥३॥

अर्थ :
विषयाची इच्छा धरली तर ते विषय आपल्यापासून दूर पळतात आणि निरिच्छा उदासीन राहिले तर सुख सोहंळे च आपल्या पाठीमागे पळतात. म्हणूनच मी तुम्हाला असे सांगतो की विषयाच्या पाठीमागे मनाला धावु देऊ नका खरे सुख प्राप्त करून घ्यायची असेल तर हीच खूण आहे. दुःख होण्याचे खरे वर्म आमिष आहे आणि त्यामुळे विविध प्रकारचे कष्ट देखील होत असतात. तुकाराम महाराज म्हणतात फळाची बी आपण जेथे टाकू तेथे वृक्ष उगवूण पुन्हा ते फळ तयार होते त्याप्रमाणे जिथे आपण इच्छा धरू तेथे आपल्याला दु:ख होते व जेथे आपण निरिच्छ राहू तेथे आपल्याला सुख प्राप्त होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग