वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

अरे स्वरूपाकारणे विश

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074234 · अभंग क्र. ५७०

570.
अरे स्वरूपाकारणे विश्वरूप घेतले ।
सगुणे झांकिले निर्गुणरया ॥१॥
तत्त्वी तत्त्व कवळी उगवे रविमंडळी ।
अवघीच झांकोळी आपुल्या तेजे ॥२॥
द्रष्टयाचिये दीप्ती दृश्यचि न दिसे ।
समरसी भासे तेज त्याचे ॥३॥
चित्स्वरूपी नांदे चित्स्वरूपी भासे ।
ॐकारासरिसे तदाकार ॥४॥
प्रेमकळी ओतले सोज्वळीत तेज ।
तेथे तू विराज ज्ञानदेवा ॥५॥

अर्थ :
आपल्या भक्तांकरिता भगवंतानी विश्वरूप धारण केले व त्यामुळे निर्गुण स्वरूप झांकून गेले. मूळच्या निर्गुण स्वरूपाची कळा ज्यावेळी सूर्य तेजाप्रमाणे अंतःकरणांत उगवते. त्यावेळी बाकीची वैषयीक अनात्मज्ञाने सर्व लोपून जातात. सूर्य तेजापुढे सचंद्र नक्षत्रे लुप्त होतात. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानवान द्रष्टा त्याच्या यथार्थ प्रकाशापुढे दृश्य म्हणून दिसतच नाही. सर्व द्रष्टा होऊन जातो. हा सर्व व्यवहार परमात्म्याच्या सत्स्वरूपावर भासतो चित् स्वरूपांवर नादतो आणि सत् चित् आनंद स्वरूपांचे प्रतिक जो ॐकार तोही तद्रूपच होऊन जातो. त्या प्रेम कळीत म्हणजे आनंद स्वरूपांत ओतलेले जे निर्दोष ज्ञान त्याच स्वरुपाचे ठिकाणी तू विराजमान हो असे निवृतीरायांनी उत्तर दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग