वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

कर्पुर अग्नीसी स्वदे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074815 · अभंग क्र. २०८

208.
कर्पुर अग्नीसी स्वदेहा नाशी ।
चंदनी मासी न थरे देखा ॥
घ्राणाची कळिका भ्रमर रुंजीका ।
तेथील झुळुका जी करी ॥
मोतियाचा चारा राजहंसा सैरा ।
दुजिया पाखिरा कामा नये ॥
ज्ञानदेव म्हणे घेती ते शाहाणे ।
येर ते पाहुणे यमाचे रया ॥

अर्थ :
कापूर सुगंधी असतो पण त्याचा अग्निसी संबंध पावला तर नाश होतो. अग्नीत पडलेल्या सुगंधी चंदना वर तर त् माशी बसत नाही. कमळच्या फुला भोवती भुंगे रुंजी घालतात. पण ते कमळ फुलाच्या नाही तर त्याच्या सुवासा मुळे येतात. मोत्यांच्या चाऱ्यांची गोडी एका राजहंसालाच कळते दुसर्याला ती चव कळणार नाही. स्वतःत असणारे ब्रह्मस्वरुप ओळखणारे शहाणे असतात जे तसे ओळखत नाहीत ते सहज यमाचे पाहुणे होतात असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग