यमुनेचे तीरीं नवल पर
160.
यमुनेचे तीरीं नवल परि वो । तेथे गोपाळ वत्से स्वयं झाला हरी वो ॥१॥
नवल देखा ठक तिन्ही लोका । भुली ब्रह्मादिका पार नाही सुखा ॥२॥
कृष्णवत्साची ध्वनी गाइ पान्हा । तेथे वोळले निराळे विस्मयो गौळीजनां ॥३॥
गोपाळांचे वचनी सुखें सुखा भेटी । तेथे वोसंडला आनंद माय कृष्णीं भेटी ॥४॥
ऐसा रचिला आनंद देखोनि निवाडा । तेथे सृष्टिकर्ता तोहि झाला वेडा ॥५॥
ऐसे अचोज पै मना नये अनुमाना । अचुंबीत करनें एका जनार्दना ॥६॥
