संत कैसेनि भेटती ।
703.
संत कैसेनि भेटती ।
कैसेनि होती कृपावंत ॥१॥
सांगा निगुती हे आम्हासी ।
तुमच्या पायांसी लागतो ॥२॥
काय ते करावे पूजन ।
काय ते धन समर्पावे ॥३॥
निळा म्हणे शरण जावे ।
कैसे विनवावे कोण युक्ती ॥४॥
703.
संत कैसेनि भेटती ।
कैसेनि होती कृपावंत ॥१॥
सांगा निगुती हे आम्हासी ।
तुमच्या पायांसी लागतो ॥२॥
काय ते करावे पूजन ।
काय ते धन समर्पावे ॥३॥
निळा म्हणे शरण जावे ।
कैसे विनवावे कोण युक्ती ॥४॥