वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

दुर्जनाचे अंग अवघेचि

🙏 3. संत तुकाराम · ABH-078137 · अभंग क्र. २१३७

2137.
दुर्जनाचे अंग अवघेचि सरळ । नरकाचा कोथळ साठवला ॥१॥
खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणे ॥धृपद॥
सर्पा मंत्र चाले धरावया हाती । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥
तुका म्हणे काही न साहे उपमा । आणीक अधमा वोखटयाची ॥३॥

अर्थ :
दुर्जनाचेअंग म्हणजे सरळसरळ आहे त्यामध्ये त्याने नरकाचा कोथळा साठवलेला आहे. अमंगळ खातो आमंगळ बोलतो आणि त्याच्या संगतीत जे कोणी असतात त्यांचे बोलून बोलून सारख डोके उठवीत असतो. सर्प ला पकडण्यासाठी देखील मंत्र उच्चारले की सर्प हाती येतो परंतु दुष्ट माणसाची जात अशी असते की त्याला काहीही केले तरी ते हातात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात दुर्जन मनुष्याला जगातील कोणतीही वाईट उपमा सजेशी ठरतच नाही कारण त्यांच्या पेक्षा वाईट जगामध्ये कोणीही नसते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग