वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › ३. घोंगडी भारुड

(घोंगडीची रूपके)

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073499 · अभंग क्र. १०

10.
(घोंगडीची रूपके)
आता मी देवा पाघरो काई । भिकेचे ते ही उरेचि ना ॥१॥
सदैव दुबळे नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥धृपद॥
नाही मजपाशी फुटकी फोडी । पाचांनी घोंगडी दिली होती ॥२॥
तुका म्हणे जना वेगळे झाले । एकचि नेले एकल्याचे ॥३॥

अर्थ :
देवा पंचमहाभूतांकडून भीक मागून आणलेला माल माझे देहरुपी घोंगडे तू चोरुन नेले आता मी काय पाघरावे ? हा चोर असा आहे त्याला गरीब आणि श्रीमंत काहीही कळत नाही एखादयाचे घर त्याला दिसले चांगले वाटले की तो त्याचे घरच फोडून त्याच्या घरात शिरुन चोरी करतो. देवा आता माझ्याजवळ फुटकी कवडी देखील शिल्लक राहिली नाही पंचभूतांनी जी मला घोंगडी दिली ती देखील तू घेऊन गेलास. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने चोर होऊन माझे देहरुपी घोंगडी चोरली सर्व लोकापासून मला वेगळे करुन सर्वांच्या बंधनातून मुक्त केले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग