नेत्र लाउनी मनासी जव
770.
नेत्र लाउनी मनासी जव पुसो जाय ।
तव देवे नवल केले गे बाईये ॥१॥
देवे नवल केले देवे नवल केले ।
शेखी सांगता लाजिरवाणे ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठले ।
माझे बाह्य अभ्यंतर व्यापिले ॥३॥
अर्थ :
डोळे लाऊन म्हणजे विचार करून मनाला जर विचारले तर देवाने काय चमत्कार केला. देवाने मोठे नवल केले. काय नवल केले म्हणून विचारशील तर सांगणे कठीण. पण इतके सांगता येईल की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी मला अंतर्बाह्य व्यापून टाकले. असे माऊली सांगतात.
