ज्ञान ध्यान जप तप सा
831.
ज्ञान ध्यान जप तप साधन ते|नाम प्रत्ययाते न ये कोणा ॥१॥
गुरुपदी जावे आधी हो शरण|मी हे माझे ओळखुन घ्यावे नाम ॥२॥
तयाचे ते मूळ पाहोनिया त्याते |मिळवावे द्वैत अद्वैताते ॥३॥
द्वैत द्वैतातीत स्वयंभ संचले |तेंचि नाम आले त्रिभुवनी ॥४॥
नामदेव म्हणे परब्रह नाम |द्वैत क्रियाकर्म नाही तेथे ॥५॥
