वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

कापुराचे भांडे म्या

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074359 · अभंग क्र. ६७४

674.
कापुराचे भांडे म्या ब्रह्मरसे भरिले ।
घ्राणी निमाले परिमळेसहित ॥१॥
तेथे परिमळु नाही स्वादु पै नाही ।
सुख दुःख नाही कांहींचि नाही ॥२॥
रखुमादेविवरेसी ठक पडिले कांहींच नाही ।
चौघे स्वभावे बोलताती ॥३॥
कापुरासारखे शुद्ध अंतःकरणरुपी भांडे मी ब्रह्मरसाने भरले. त्यामुळे सुंगधासह वर्तमान घ्राण त्याठिकाणी लय पावले. आता त्याठिकाणी सुगंध, स्वाद, सुखदुःख वगैरे काही एक नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्याचे ठिकाणी माझे चित्त गुंतल्यामुळे त्यांच्यावांचून दुसरे काही एक उरत नाही. असे चारी वेद सहजरितीने प्रतिपादन करतात. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग