वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

युगे अठ्ठावीस विटेवर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073595 · अभंग क्र. ३९७

397.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिका भेटी परब्रम्हा आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा ।
पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊन कटी ।
कासे पीताबंर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन हेळामत्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग