चंद्र पौर्णिमेचा दिस
11.
चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंढरीये ॥१॥
क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करिता जाय महत्पाप ॥२॥
सनकसनंदन सम पुंडलिक । शोभा अलोलिक वर्णू काय ॥३॥
लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एकाजनार्दनी पायी लीन झाला ॥४॥
