गोसावीपणाचा दाखविती
1852.
गोसावीपणाचा दाखविती वेष | नाही निजध्यास हरिनामी ॥१॥
वरी वरी आर्त दाविती झगमग | अंतरी तो संग विषयाचा ॥२॥
व्यर्थ लोकांपुढे हालविती माना | केली विटंबना संसाराची ॥३॥
नामा म्हणे मन ‘गुंतेल पांडुरंगा | आता ऐशा सांगा कोण रीती ॥४॥
