वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 245. मरीआई ३९१६

मरीआई ३९१६

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084581 · अभंग क्र. ३९१६

3916.
मरीआई ३९१६

कनगुळी भानगुळी सुप टोपली । आदिमाया नमो भगवती । मानवी हो काय करुनठेविलीये । निवांत देखिलीये ॥१॥ मरीआईचाकोरडा वाजतो । सिवेंवरी कोरडा वाजतो । गाडयावरी कोरडा वाजतो॥ध्रु.॥चारी पुरुषार्थप्रसंगी घालुनी । निरंजनी पुंडलीकाचे द्वारी बैसोनीभक्ति पुरस्करोनी । निवांत देखियले । मच्छे कच्छेवराहे नारसिंह, वामने परशरामे रामे कृष्णे बौध्येकलंकिये सीते जान्हवीये ॥३॥ वैष्णव कुळाचाउध्दार करोनी चौंवर्णाचे मळवट भरोनी । अठराजणांची रांडोळी करुनी । गाढे दृढ दैत्यांचीआहुती घेऊनी । बळी बगाडे तुजला देऊनी ॥४॥ अनुरुतब्रह्मांड तुझा देव्हारा । म्हणुन तुला अर्पिलामाय तरुवरा । लिंबे घेऊनी नारळे मारा ॥५॥ ऐसीपुजीयेली नरतनु । भक्तांसी करिसी विनवणु । तैसेंनव्हे रे ज्ञान अझुनु । प्रसन्न होऊनी ये खेळीप्रपंचभानु ॥६॥अंबा अंबिका प्रसन्न होऊनी । वैष्णवासी दर्शन देऊनी । सावळे रुप प्रगटोनी । वैष्णवामाजीं गर्जोनी । सिंहनादे एका जर्नादनी । भरुनी अंबा निवांत राहीलीये ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग