(मुंढा, हिंदीपदे)
3933.
(मुंढा, हिंदीपदे)
संबाल यारा उपर तले दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥
प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई । प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥धृपद॥
उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेका खचलावत भार ॥२॥
कहे तुका चलो एका हम जिन्होके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥३॥
अर्थ :
हे माझ्या मित्रा तू वरती यमाच्या आणि खाली पशूयोनी दु:खाच्या तडाख्यापासून सावध रहा. आणि जो या दोन गोष्टीपासून दक्ष राहीन तो वाचेल नाहीतर निष्काळजी राहिला तर त्याची लूट होईल. त्यामुळे अरे बाबा देवावर प्रेम कर आणि देवाच्या प्राप्तीविषयी प्रयत्न कर. प्रपंचामध्ये उडया मारणे त्याच्या आनंदात ढुंगण वाकडे करुन नाचणे हे कशाला करतोस त्यामुळे देवाच्या प्रेमाचा विसर पडेल आणि हे गोसाव्या तुझ्या काखेत झोळी कृष्णंजीन यांची लडबड आणि खडाव्याची खडबड कशाला पाहिजे का त्याचा भार व्यर्थ तू चालवत आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे हे लोकांनो आम्ही तुम्हाला ज्या संतांच्या स्वाधीन करु त्या संतांना तुम्ही काहीही दान देण्याविषयी हात वरती ठेवाल तर तुमचा नावलौकिक आणि परमार्थिक अधिकार वाढेल.
