वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

आत्मा अंगे प्रसिद्ध

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074353 · अभंग क्र. ६२६

626.
आत्मा अंगे प्रसिद्ध देखिला ।
अंतर्बाह्य अलिप्त व्यापला ॥१॥
देखिजेसे नाही देखिले म्हणती काई ।
देखणे तेंही देखतुसे ॥२॥
रूपरेखा नाही लक्षावा कवणे ठायी ।
लक्षी लक्षितांही परतल्या दृष्टि ॥३॥
ज्ञानदेव म्हणे आनंद होईल पूर्ण ।
अनुभवे तेचि खूण देखतसे ॥४॥

अर्थ :
आत्म्याचे अपरोक्षज्ञान झाल्यावर तो सर्व दृश्य वस्तुच्या आत बाहेर व्यापलेला असूनही अलिप्त आहे. हे अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही काय दिसले असे विचारल्यास त्या आत्मस्वरूप ज्ञानाचे वर्णन करता येत नसल्यामुळे काही नाही असेच म्हणण्याचे पाळी येते. पण आत्मानुभव मात्र असतोच. ज्याला रूप नाही, आकार नाही. अशी वस्तु पाहावी तरी कोठे? बरे जर दृष्टीने काही पाहण्याचा प्रयत्न करावा तर त्या दृष्टीने आत्मस्वरूपाचे आकलन न होता ती परतते. आत्मज्ञानाने ब्रह्मानंद प्राप्त होतो हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग