लवथवती विक्राळा ब्रम
418.
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥धृ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥
देवी दैत्यी सागर मंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हळहळ जे उठले ।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीलकंठ' नाम प्रसिध्द झाले ॥३॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे ।
उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥४॥
