उग्रसेन राज्यस्थापना
193.
उग्रसेन राज्यस्थापना
राज्यी स्थापियेला उग्रसेन तेव्हा । देवकी वसुदेवा सोडविले ॥१॥
देवकीच्या स्तनी फुटलासे पान्हा । वसुदेव द-र्शना करीतसे ॥२॥
वासुदेवे केले त्याचे समाधान । गायी दिल्या दान ब्राह्मणांसी ॥३॥
समस्तांचि क्रिया करी उग्रसेन । झा-लासे दिवाण देव त्याचा ॥४॥
पळोनिया गेले होते जे यादव । आणियेले सर्व रामकृष्णे ॥५॥
आनंद न माये सकळ लोकांला । मथुरेत राहिला नामा ह्मणे ॥६॥
