वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

निळिये रजनी वाहे मोत

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074994 · अभंग क्र. ३५

35.
निळिये रजनी वाहे मोतिया सारणी ।
निळेपणे खाणी सापडली ॥
आंगणी चिंतामणी जळधरु सिंपणी ।
अमृतसाजणी जीवनकळा ॥
सुमनाचे शेजे विरहिणी विराजे ।
शयनी सुलजे आरळ सेज ॥
माजयांने हटी मुखकमळ टेंकी ।
निळिये अवलोंकी कृष्णमूर्ति ॥
कमळणी आमोद सुस्वाद मकरंद ।
चंदनाची अभेद उटी अंगी ॥
कर्पूरपरिमळे दिव्य खाद्य फळे ।
ठेऊनि सोज्वळे वाट पाहे ॥
मन तो निळिये गोविंदचिये सोसे ।
विरहिणी पाहे वाटुनी ऐसे ॥
ज्ञानदेवी निळिये वाटुनि गोविंदी ।
कृष्ण निळिये पदी ठाव जाला ॥

अर्थ :
मोत्याच्या सारणीतुन निळी रात्र वाहात आहे. अशी निळ्या मोत्यांची खाणच सापडली. तो चिंतामणी होऊन हृदयात अमृताचे शिंपण करतो. ती विरहिणी त्या पुष्प शय्येवर पडुडली आसुन ती तळमळत आहे. त्याने निळे मुखकमळ एकदा दाखवावे असे तिला मनोमन वाटते. ती विरहिणी मधाची चव व कमळाचा सुगंध घेऊन चंदनाची उटी लाऊन बसली आहे. कर्पुर मश्रीत उटी लाऊन ती रसरशित फळे घेऊन त्याची वाट पाहात आहे. तीचे मन त्या गोविंदाच्या सोसाने आतुरले असुन ती विरहिणी विरहात तळमळत आहे. त्या निळ्या गोविंद च्या निळ्या कृष्णपदात निळेपणे मनाला ठाव दिला आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग