वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

न पवे सन्निध वाटते च

🙏 3. संत तुकाराम · ABH-079632 · अभंग क्र. ४०३५

4035.
न पवे सन्निध वाटते चिंता । वरी या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सापडलो ॥१॥
बहु भार पडियेला शिरी । मी हे माझे मजवरी । उघड्या नागविलो चोरी । घरिंच्याघरी जाणजाणता ॥धृपद॥
तुज मागणे इतुले आता । मज या निरवावे संता । झाला कंठस्फोट आळविता । उदास आता न करावे ॥२॥
अति हा निकट समय । मग म्या करावे ते काय । दिवस गेलिया ठाकईल छाय । उरईल हाय रातिकाळी ॥३॥
होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपता । बहुत चिंता प्रवर्तली ॥४॥
ऐसी या संकटाची संधी । धाव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥५॥

अर्थ :
देवा मला तुझे सान्निध्य घडत नाही त्यामुळे मला खूप चिंता वाटते देवा माझ्यावर खूप जनांची सत्ता आहे देवा त्याचे तू निवारण करावे. देवा मी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे परंतू उलटच होते मी आणखी त्याच्यात गुंतला जात आहे अशा प्रकारे मी बलवंत अशा कर्माच्या बंधनात सापडलो आहे. देवा माझ्या माथ्यावर मी आणि माझे अशा प्रकारचा मोठा भार पडलेला आहे. देवा हे सर्व मला उघड उघड माहित आहे तरी देखील मी घरच्या माणसांकडूनच नागवला गेलो म्हणजे घरच्या माणसांनीच माझी चोरी केली, मला लुटले. देवा आता माझे तुला इतकेच मागणे आहे की, तू मला संतांच्या स्वाधीन करावे. देवा आता तुला आळविता आळविता माझा कंठ फुटला आहे त्यामुळे तू आता मला उदास करु नकोस. देवा ही अगदी शेवटची वेळ आहे अशा वेळी तू जर माझे ऐकले नाही तर मग मी काय करावे ? देवा एकदा की आयुष्य भानू अस्ताला गेला तर अज्ञानाचा अंधार सर्वत्र पसरेल आणि माझ्या हाती केवळ हाय

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग