तुजऐसा नाही देखला उद
658.
तुजऐसा नाही देखला उदार ।
श्रुतिशास्त्री फार वर्णियेला ॥१॥
तोचि का हा देव विटेवरी उभा ।
चैत्यनाचा गाभा पूर्ण दिसे ॥२॥
मिटोनी लोचन कर कटेवरी ।
दृष्टि हितावरी ठेवोनिया ॥३॥
बहिणी म्हणे देवा ओळखिले पूर्ण ।
अंतरीचा वर्ण हाचि असे ॥४॥
