वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 225. ह्याळसेन कथा (द्रोण पर्व)

ह्याळ्सेन कथा ( द्रो

🙏 4. संत नामदेव · ABH-083894 · अभंग क्र. २१५९

2159.
ह्याळ्सेन कथा ( द्रोनपर्व )

तयेवेळी तो ह्माळसेनू । श्रीकृष्णासी नमस्कारानू । पा-डवासी वंदनू । मग सकळिका रायांसी ॥१॥
मग रायासी स्वधर्मे । तेणे आलिंगिले अनुक्रमे । संतोषोनी राया धर्मे । बैसविला ॥२॥
बंदीजन पवाडे पढती । अगाध ब्रीदे वाखाणिती । सकळ परिवा-रासहिती । ह्माळसेनाचा ॥३॥
धन्य धन्य अर्जुना़चे झाले । पूर्व-पुण्य फळासी आले । एकाहून एक झाले । अधिकाधिक ॥४॥
तंव दुर्योधन म्हणे वीरा । आता चलावे मेळीकारा । बैसोनी एक वाट विचारा । योजावे कांही ॥५॥
ह्माळसेनु विनवी श्रीहरी । स्वाभी जावे मेळीकारी । दिनु मावळलियावरी । येईन देवा ॥६॥
आजी कौरवाजी पैज । जंववरी मावळेल सूर्य । तंववरी घेईन झुंज । रणा-माजी ॥७॥
जंव असे आस भरोवरी । तंव घेईन झुंजारी । रेखा पुसलिया संसारी । कवणु वांचे ॥८॥
जंव मावळे दिन । तंववरी वांचेल प्राण । तरी देखेन तुझे चरण । नारायणा ॥९॥
नातरी पि-तयाचे कारणी । माझे प्राण वेंचिती रणी । तरी सदैव मजवांचुनी । दुजा नाही ॥१०॥
आणि कोटी जन्माचे पुण्य । जे देखिले तुझे चरण । तरी मज वैकुंठभुजन । वस्ति करी ॥११॥
तंव बोलिला शारंगपाणी । जे जे इच्छा धरिसी मनी । तितकी पावसी निर्वाणी । संदेहो नाही ॥१२॥
ऐसे बोलोनी निघाला । सैन्या पुढीचा भंवडिला । श्रीकृष्ण पाडवेसी आला । मेळीकारी ॥१३॥
मग पाठविले बंदीजना । जा-उनी सांगा दुर्योधना । केंवि सांडोनी अभिमाना । जात असा ॥१४॥
न जिंकता पुढील वैरी । कैसे जाता मेळीकारी । ऐसी नव्हे भरो-वरी । क्षात्रधर्माची ॥१५॥
मेळीकारी जाता सैन्य । तंव पातले बंदीजन । तेही देउनी आशिर्वचन । ब्रह्मावो केला ॥१६॥
म्हणती दुर्योधना राजाधिराजा । क्षात्रपणाची घेउनी पैजा । तरी का आणि-तसा लाजा । क्षात्रपणासी ॥१७॥
रणी वैरिया देऊन पाठी । न घालिता पुरुषार्थाची गांठी । मेळीकारा उठाउठी । केवी जाता ॥१८॥
नातरी सांडुनी हातीयेरा । राज्य द्यावे युधिष्ठिरा । जावे आपुलिया घरा । कुटुंबामाजी ॥१९॥
मनामाजी न धरावी लाज । सांडावी वांटिवेची पैज । तरी तुमचे निके काज । फळासी येईल ॥२०॥
जरी क्षात्रधर्माची आयनी । पुरुषार्थ कराल समरंगणी । तरी भ-टाची कास धरूनि । युद्धासी चला ॥२१॥
ऐसी तिखत उत्तरे करून । बोलते जाले बंदीजन । तेणे खोंचले मन । महा वीरांचे ॥२२॥
मग कुंचा भवंडिला जाणा । सैन्य लागले भेरी निशाणा । शंख नादाचे स्फुरणा । रण तुराचे ॥२३॥
वीर सिंहनादे गर्जती । कुंजर किंका-ळिया देती । रथ चक्रे घडघडती । थोर नादे ॥२४॥
उन्नत जालिया आरणी । कौरव उभे ठेले रणी । भाटा दिधली पेटवणी । बोलावी वेगी ॥२५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग