वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पाईकाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079613 · अभंग क्र. ३६३५

3635.
(पाईकाचे अभंग)
पाईकपणे खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीने ॥१॥
पाईक जाणे मारिते अंग । पाईकासी भंग नाही तया ॥धृपद॥
एके दोही घरी घेतले खाणे । पाईक तो पणे निवडला ॥२॥
करूनि कारण स्वामी यश द्यावे । पाईका त्या नांव खरेपण ॥३॥
तुका म्हणे ठाव पाईका निराळा । नाही स्वामिस्थळा गेल्याविण ॥४॥

अर्थ :
जो एकनिष्ठेने स्वामीची सेवा करतो तोच स्वामीच्या बक्षीसास पात्र होतो व त्याचीच किर्ती सर्वत्र होते. युध्दप्रसंगी कसे युध्द करावे हे ज्याच्याकडे कौशल्य आहे तोच खरा शूर शिपाई आहे व त्याच्या सेवकपणाला कधीही भंग येत नाही. जो शूर शिपाई शत्रूच्या एक दोन घरामध्ये घुसून त्यांचा माल लुटून आणतो तो शिपाई सर्व शिपायामध्ये निराळाच निवडला जातो अगदी त्याप्रमाणे साधकरुपी शिपायाने आपल्या अंत:करणातील काम क्रोधरुपी एक दोन विकारांना मारले पाहिजे. विविध प्रकारचे युक्त्या प्रयुक्त्या करुन स्वामीला यश मिळवून दयावे अश्या शिपायाला खरा शिपाई म्हणून नांव मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा शूर शिपायाला एका स्वामीवाचून दुसरे कोणतेही ठिकाण माहित नसते व तो तेथे गेल्यावाचून राहातही नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग