अनुपम्य उपासना । अनु
341.
अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये ॥१॥
अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिगाड तुटत ॥२॥
अनुपम्य पंढरीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्यांचे ॥३॥
अनुपम्य नाचती वैष्णव । अनुपम्य गौरव तयांचे ॥४॥
अनुपम्य एका जनार्दनी । अनुपम्य चरणी संताचिये ॥५॥
