वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

नव्हे त्याची दुराशा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074347 · अभंग क्र. ६२९

629.
नव्हे त्याची दुराशा म्या सांडिली वो आस ।
ज्ञान वैराग्यभक्तिसार वोळला वो माय ॥१॥
सच्चिदानंदघनु आनंदे ओळला ।
मग मज फावला हा विठ्ठल वो माये ॥२॥
संभोग वोवरी होतिये निदसुरी ।
योगिणी खेचरी मज जागविले वो माये ॥३॥
ऐसा हा योगिराजु तो विठ्ठल मज उजू ।
बापरखुमादेविवर देऊ ठेले वो माये ॥४॥

अर्थ :
वस्तुतः सत्य नसलेल्या स्त्री धन पुत्रादि पदार्थाची मी आजपर्यंत आशा करात होतो. परंतु माझी दूराशाच झाली. ती मी नित्यानित्य विचाराने टाकून दिली आणि नित्य वस्तूच्या प्राप्तीकरिता ज्ञान आणि वैराग्य आणि श्रीहरिच्या भक्तीरसाकडे वळलो. किंवा मी दुराशा टाकून दिल्यावर ज्ञान वैराग्य आणि भक्ति ही माझ्याकडे धावून आली. आणि त्याच्या माग सच्चिदानंद घन जो श्रीविठ्ठल तोही धावून माझ्यावर अनुग्रह करण्याकरता आला. त्यामुळे मला त्याची प्राप्ती झाली. व त्या परमात्मनंदाच्या अंतपुरांत मी स्वस्त निजलो असता जीवन्मुक्तीच्या विशेष भोगार्थ योगसाधनादि खेचरी मुद्रा तिने मला जागे केले. असे हे माझे पिता व रखुमाईचे पती योगेश्वर श्रीविठ्ठल, त्यानी हे सोपे पारमार्थिक धन मला दिले असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग