आता मी अनन्य येथे अध
341.
आता मी अनन्य येथे अधिकारी । होइन कोणे परी नेणे देवा ॥१॥
पुराणीचाअर्थ : आणिता मनास । होय कासावीस जीव माझा ॥धृपद॥
इंद्रियांचे आम्ही पागिलो अंकित । त्याचे रंगी चित्त रंगलेसे ॥२॥
एकाचे ही मज न घडे दमन । अवघी नेमून कैसी राखो ॥३॥
तुका म्हणे जरी मोकलिसी आता । तरी मी अनंता वाया गेलो ॥४॥
अर्थ :
मी कोणत्या साधनेने तुमच्या भक्तीचा अनन्याधिकारी होईन हे मला समजत नाही. पुराणातीलअर्थ : मनात आणला कि भक्तीमध्ये किती मन विरक्त करावे लागते याचा विचार केला की माझे मन कासावीस होते. कारण आम्ही इंद्रियाचे पूर्णपणे अंकित झालो आहोत त्या इंद्रियांच्या विषयातच आम्ही रंगून गेलो आहोत. हे देवा मला एकाच इंद्रियांचे दमन करता येत नाहीतर सर्व इंद्रियांना मी ताब्यात कसे ठेवू ? तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता तुम्ही जर आता उपेक्षा बुद्धीने माझा त्याग कराल तर मी पूर्णपणे वाया गेलो असे समजा.
