आनंदे उदो बोलणें भवा
9.
आनंदे उदो बोलणें भवानीचा ॥ धृ. ॥
नवरात्री घट मांडू ।
दिवे ओवाळूनी सांहूं ॥
कळिकाळा संगे भांडूं ।
वर देई वंशाचा ॥ १ ॥
नाचूं अंबेचे अंगणी ।
गोंधळ घालूं वो साजणी ॥
शरण येऊ लोटांगणी ।
कायावाचामनेसाचा ॥ २ ॥
अंबा नांदे सर्वां ठायी ।
अशी सर्वत्राची घाई ॥
मध्वनाथ म्हणे आई ।
वर देई वंशाचा ॥ ३ ॥
