कीर्तनी स्वधर्म वाढे
1403.
कीर्तनी स्वधर्म वाढे । कीर्तनी जोडे चित्तशुद्धी ॥१॥
ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक सांगे परिक्षिती साचा ॥२॥
होती पावन अधम जन । करिता कीर्तन कलियुगीं ॥३॥
एका त्याचा दासानुदास । जाती कीर्तनास आवडी जे ॥४॥