मेसाई ३९३४
3934.
मेसाई ३९३४
मेसको मैराळें तुमसणीचें आई । धांवपाव वेगी माझे नमन तुझे पायी ॥१॥ पंढरीचाहनुमान याते कोण कोड घाली । जाळीयेली लंकायेणे तोंडे केली काळी ॥२॥ दोंदील गण्या यातेंपाचारुनी काई । उंदरावर बैसोनि केव्हांधावेल आई ॥३॥ कैलासीचा शंभुबाई आवडेना मला । लागलाभिल्लीणी पाठी कोठे पाहु त्याला ॥४॥लक्ष्मीचावर खोटा आवडेना आम्हा । धरियेला भाव तेणेंमारियेला मामा ॥५॥ एक सेलाएक मेलाएकसिंदीचाघडा । घेऊनियां आई आमुचे उकली तू कोडा ॥६॥ इतुके घेऊनी आई पाव तु आम्हांसी । एकाजनार्दनीं विनवितो तुजसी ॥७॥
