वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

आठवे देव तो करावा उप

🙏 3. संत तुकाराम · ABH-078540 · अभंग क्र. ५८३

583.
आठवे देव तो करावा उपाव । येर त्यजी वाव खटपटा ॥१॥
होई बा जागा होई बा जागा । वाउगा का गा सिणसील ॥धृपद॥
जाणिवेच्या भारे भवाचिये डोही । बुडसी तो काही निघसि ना ॥२॥
तुका म्हणे देवा पावसील भावे । जाणता ते ठावे काही नव्हे ॥३॥

अर्थ :
ज्या उपायाने देवाची आठवण येते तोच उपाय कर. बाकीच्या खटपटी तू टाकून दे. जागा हो रे बाबा, जागा हो रे बाबा, व्यर्थ कशाला शिन करतोस. तू ज्ञानाच्या ओझ्याने भवरूपी डोहात बुडालास तर वर निघू शकणार नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात तुला जर वाटत असेल देवाची प्राप्ती व्हावी तर देवाविषयी दृढ भक्तिभाव ठेव ज्ञानी पणाच्या अहंकाराने तुला काहीही प्राप्त होणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग